भेट देणा-यांची संख्या

माझ्या शैक्षणिक ब्लॅागमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.संपर्क करा -८९९९९१३८९१

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

ई-पुस्तक प्रकाशन सोहळा

📕📕📕📕📕📕📕📕📕📕

          जागर जाणीवांचा

       ...ई-बुक प्रकाशन...!!

वाबळेवाडी शाळा भेटीनंतर आलेल्या अनुभवांचे एकत्रित संकलन व्हावे ही डाॕ.वैशाली वीर झनकर,शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी सूचना केली होती.त्यानुसार जागर जाणीवांचा ही e-book pdf वाचकांहाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.वाबळेवाडी शाळेस भेटीचे इत्यंभूत वृत्तांकन ही वाबळेवाडीची घरबसल्या सफर ठरेल यात शंका नाही.मा.भुवनेश्वरी मॕम,सीईओ व मा.वैशाली झनकर वीर  यांच्या शुभेच्छा संदेशासह हे ई बुक नक्कीच सगळ्यांना  प्रेरणादायी ठरेल.
            जागर जाणीवांचा ई बुकमध्ये एकूण ३८ लेख असून वाबळेवाडी टीमला भेट दिलेल्या डाएटमधील अधिकारी व जिल्हा परिषदेचे  शिक्षक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून व अनुभवातून साकारलेली वाबळेवाडी सचित्र रेखाटण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
         सदर ई बुकचे प्रकाशन २८ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी मा.वैशाली झनकर वीर मॕम यांच्या हस्ते झाले.यावेळी दिलीप गोसावी सर,वाल्मिक चव्हाण सर व पांडुरंग देवरे सर उपस्थित होते.

दिलीप गोसावी
टीम सुपर ३०

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

भाषांतर करा